nepal – नेपाळमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी रस्त्यांवर दगडफेक आणि जाळपोळ सुरू केली आहे. अनेक ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान के पी ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अनेक मंत्र्यांनी देखील राजीनामे दिले आहेत.

नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नेपाळची राजधानी काठमांडूसह देशभरात हिंसक निदर्शने सुरू आहेत. अनेक शहरांमध्ये तरुणांकडून तोडफोड आणि जाळपोळ केली जात आहे. आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या खासगी निवासस्थान पेटवून दिले. अनेक मंत्र्यांची घरेही पेटवून दिली आहेत. नेपाळच्या अर्थमंत्र्यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण केली आहे.

हे आंदोलने सुरू होण्यामागील मुख्य कारण म्हणजे सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणे.
