मुंबई – नशेसाठी मोटार सायकल चोरी करणा-यास गुन्हे शाखा कक्ष १ काशिमीरा पोलिसांनी अटक करून एकूण ९ गुन्हे उघडकीस आणेल. विघ्नेश उदय मिश्रा असे अटक कऱण्यात आलेल्याचे नाव आहे.

राजेश कन्हैयालाल जैन यांची ३०,०००/- रु किं. ची. दुचाकी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी करून नेली असल्याबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे विघ्नेश उदय मिश्रा यास अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ४,२०,०००/- रुपये किंमतीच्या १० मोटार सायकली हस्तगत करून एकूण ९ गुन्हे उघडकीस आणेल.