mumbai – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने विनय राजेश पारेख यास २९.८८ कोटी रुपये इतक्या किंमतीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) घेऊन करचोरी केल्याप्रकरणी अटक केली आहे.

सदर अटक मेसर्स अॅन्जल प्लाय अॅन्ड लॅम या फर्म मध्ये करण्यात येत असलेल्या पुढील तपासाचा एक भाग आहे. विभागाने अशा करचोरी करणाऱ्या करदात्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे, जे वस्तू किंवा सेवा प्रत्यक्ष न पुरवता बनावट बिले तयार करून आयटीसीचा अवैध लाभ घेत आहेत. हे महाराष्ट्र/केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे उल्लंघन आहे.
विनय राजेश पारेख हे मेसर्स अॅन्जल प्लाय अॅन्ड लॅम या फर्मचे प्रोप्रायटर असून या फर्ममार्फत सुमारे २९.८८ कोटींची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतला असून आरोपी विनय राजेश पारेख याला अटक करण्यात आली आहे.