mumbai – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे खाते अखेर बदलण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे आता क्रीडा व युवक खाते देण्यात आले आहे, तर माणिकराव कोकाटे यांच्या कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडीओ व्हयरल झाला होता. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी विरोधकांनी केली होती. परंतु राज्य सरकारने कोकाटे यांचा राजीनामा न घेता फक्त त्यांच्या खात्यामध्ये बदल केला आहे.