kalyan – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविंद्र आहिरे, वसंत देगलूरकर, सुदर्शन जाधव अशी या तिघांची नावे असून, ठाणे लाच लुचपत विभागाने हि कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या जल आणि मलनिस्सारण विभागातील रविंद्र अहिरे याला ४० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे तर मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर आणि प्रभारी स्वछता अधिकारी सुदर्शन जाधव या दोघांना २० हजाराची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
रविंद्र आहिरे यांनी एनओसी देण्याच्या बदल्यात एका विकासकाकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. ती घेताना एसीबीने त्याला रंगेहात पकडले. तर वसंत देगलूरकर आणि सुदर्शन जाधव यांनी एका आजारी कर्मचाऱ्याला कामावर रुजू करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे.