dombivali – डोंबिवली पूर्वेत क्षुल्लक कारणावरून एकावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. दादा केदार असे वार करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, दादा केदार यांचा मुलगा उदय हा मित्रांसोबत पवार नगर येथील मैदानावर दही हंडीची प्रक्टिस करत होता त्यावेळी उदयचा समीर शेख आणि कल्पेश नावाच्या मुलांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता आणि त्यातूनच एकमेकांना शिवीगाळ देखील झाली होती आणि त्याचाच राग मनात धरून समीर शेख याने पुन्हा उदय हा मित्रांसोबाबत रस्त्याने जात असताना त्याला थांबवून शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यात उदय हा जखमी झाला त्यानंतर दादा केदार यांनी त्यांचा मुलगा उदयाला दवाखान्यात नेले असता, त्याठिकाणी समीर शेख अली त्याची मैत्रीण आणि पत्नी हे तिघेजण आले आणि त्यांनी दादा केदार यांच्याशी वाद घालून अलीने दादा केदार यांच्यावर धारधार शस्त्राने वार केले.
याप्रकरणी दादा केदार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.