sangli – सांगली महापालिकेचे उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. वैभव साबळे असे उपायुक्ताचे नाव असून, दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने साबळे यांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली महापालिका क्षेत्रातल्या एका २४ मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी उपायुक्त साबळे यांनी १० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. १० लाखांची मागणी करून ७ लाख रुपयांच्या रक्कमेवर तडजोड झाली होती. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीला माहिती दिल्यानंतर त्यानुषंगाने एसीबीने सापळ रचला. त्यात उपायुक्त साबळे यांनी तडजोडीअंती ७ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, एसीबीने उपायुक्त वैभव साबळे विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आणि त्यांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.