dombivali – विरूध्द दिशेने वाहन चालवून वाहतुकीस अडथळा करणा-या ६७ वाहन चालकांवर वाहतूक विभागाकडून मानपाडा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ जून रोजी रात्री २१:०० वा. ते २४:०० वा. च्या दरम्यान मानपाडा चौकाकडून काटई नाक्याकडे जाणा-या वाहिनीवर रूणवाल गार्डन चौक ते मानपाडा चौकादरम्यान विरूध्द दिशेने वाहने चालवून वाहतुकीस अडथळा करणा-या ६७ वाहन चालकांनी उद्देशपुर्वक, धोकादायकरित्या, विरूध्द दिशेने सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर हयगयीने वाहने चालवून सार्वजनिक वाहतुकीच्या रस्त्यावर इतर व्यक्तींना त्यांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर अटकाव करून त्यांना गैरपणे निरूध्द केल्याने तसेच इतर वाहनचालकांना देखील विरूध्द दिशेने वाहने चालविण्यास अपप्रेरणा देऊन रस्ते सुरक्षा मानकांचा भंग केला म्हणून सदर वाहन चालकांविरूध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६१७/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ५४, १२६(२), २८१, २८५ सह MVDR ४/१२२, १७७(अ), १८४/१७७ MVA सह रस्ता सुरक्षा मानके नियम कलम १९०(२) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, यापुढेही कल्याण शिळ रोडवर वाहतूक नियमांचा भंग करून विरूध्द दिशेने वाहने चालवून सार्वजनिक वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी/वाहन चालकांनी सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर विरूध्द दिशेने वाहने चालवू नयेत असे पोलीस उप आयुक्त, वाहतुक विभाग ठाणे शहर यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहे.