kalyan – शाळेची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे तर दोन मुलं जखमी झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या टिटवाळा येथील बल्याणी परिसरात असणाऱ्या केबीके इंटरनॅशनल शाळेच्या मागील भागातील भिंत कोसळली असून, यात अंश राजकुमार सिंह या मुलाचा मृत्यू झाला.
केबीके इंटरनॅशनल स्कूलजवळ हि मुलं खेळत होती त्यावेळी अचानक शाळेची भिंत कोसळली आणि यात अंश सिंह याचा जागीच मृत्यू झाला तर २ मुलं जखमी झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.