mumbai – राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, सिन्नर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील रेल्वेच्या तिन्ही मार्गावर पावसाचा परिमाण झाला आहे. काही ठिकाणी पाणी साचले आहे. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे.