satara – कराड तालुक्यातील तासवडे एमआयडीसीतील एका कंपनीमधून ६ कोटींचे कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तळबीड पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या हि कारवाई केली असून, याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
तासवडे एमआयडीसीमधील बी-५६ ब्लॉकमध्ये ‘सुर्यप्रभा फॉर्मकेन’ या शेतीसाठी खते तयार करणाऱ्या कंपनीच्या आडून अवैधपणे कोकेनचा साठा केला जात असल्याची गोपनीय माहिती तळबीड पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून या कंपनीमधून तब्बल १३७० ग्रॅम वजनाचे सुमारे ६ कोटी ३५ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून कोकेनचे रॅकेट सुरू होते आणि हे कोकेन तेलंगणामध्ये विकले जात होते.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे.