ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही…

Published:

thane – ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र व टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे, बुधवार दि. २१ मे, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून रात्री ०९.०० वाजेपर्यंत एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

परिणामी, ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन व कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील.

त्याचबरोबर, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत, आवश्यक पाणी साठा करून ते पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page