न्या. भूषण गवई बनले देशाचे नवे सरन्यायाधीश…

Published:

new delhi – भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना पदाची शपथ दिली.

या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीश धनखर, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. गवई यांच्या मातोश्री देखील या सोहळ्यास उपस्थित होत्या. न्यायमूर्ती भूषण गवई पुढचे ६ महिने १० दिवस या पदावर कार्यरत राहतील. सरन्यायाधीश संजीव खन्ना हे काल निवृत्त झाले त्यांची जागा गवई यांनी घेतली.

दरम्यान, न्यायमूर्ती गवई हे मुळचे अमरावतीचे आहेत. मे २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात रुजू झाल्यापासूनच, देशासाठी प्रमुख निर्णयांत महत्वाची भूमिका बजावत आहेत. गेल्या ६ वर्षांत ते ७०० खंडपीठांत सहभागी होते. ज्यामधून त्यांनी जवळपास ३०० निर्णय घेतले. त्यांनी प्रशासकीय, दिवाणी, फौजदारी, व्यावसायिक आणि पर्यावरणीय कायद्यांसाठी उल्लेखनीय निर्णय घेतले आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page