thane – वर्तक नगर पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ झालेले ३५ मोबाईल वर्तक नगर पोलिसांनी शोधून ते तक्रारदारांना परत केले आहेत.
माहितीनुसार, वर्तक नगर पोलीस स्टेशन हद्दीत दररोज गहाळ होणाऱ्या मोबाईल बाबत तक्रारी प्राप्त होतात. त्यानुसार पोलीस ठाणे येथे प्रॉपर्टी मिसींग दाखल केली जाते. मागील काही दिवसात याचे प्रमाण वाढल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तक नगर पोलीस स्टेशन यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल जे. चिंतामण व पोलीस शिपाई नानासाहेब नागरे यांनी CEIR पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाईलची माहिती प्राप्त करून जास्तीत जास्त मोबाईलचा शोध घेऊन ते प्राप्त करण्याचे आदेश दिल्याने दिनांक २० फेब्रुवारी २०२५ ते आज पावेतो वर्तक नगर पोलीस स्टेशन प्रॉपर्टी मिसींग दाखल मधील गहाळ मोबाईल CEIR पोर्टलच्या आधारे शोधून ठाणे, मुंबई, तसेच गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, आसाम, तामिळनाडु, आणि इतर राज्यातून एकूण १०,५०,०००/- रू किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल ३५ मोबाईल प्राप्त करून वरिष्ठाच्या हातून तक्रादारांना परत करण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगीरी वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वायचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मल्हारी कोकरे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक विठ्ठल चिंतामण व पोशि नागरे यांनी केली आहे.