मुंबई – महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला ६,२४,०००/- रु. किंमतीचा गुटखा गुन्हे शाखा कक्ष – ११ पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली. राहुल धनबहादूर दास उर्फ टेका आणि सिपाहिलाल भवई पटेल अशी या दोघांची नावे आहेत.
गांधी नगर, कटींग नं. १०, कुरार गाव, मालाड (पू) मुंबई येथे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याने भरलेला टेम्पो येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून टेम्पो आणि त्यामधील २ जणांना ताब्यात घेतले. टेम्पोत ४,९९, २००/- रुपये किंमतीचा गुटखा मिळून आला. तसेच काही माल त्यांच्या राहत्या घरातून जप्त करण्यात आला. त्यामध्ये १,२४,८००/- रुपये किंमतीचा गुटखा आहे.
दरम्यान दोन्ही ठिकाणाहून मिळून आलेला गुटखा तसेच ६,००,०००/- रु किं चा १ टेम्पो असा एकूण १२,२४,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली.