kalyan – एका इराणी इसमाकडून १५ ग्रॅम मेफोड्रोन (एम.डी.) हा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. हाशमी जाफर हुसैन जाफरी असे याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उप आयुक्त परि. ०३, कल्याण यांचे विशेष कारवाई पथक व खडकपाडा पोलीस स्टेशन यांनी हि संयुक्त कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत अटाळी परिसरात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणारे पेडलर व अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपीतांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता पोलीस गस्त घालत होते त्यावेळी बंदरपाडाकडून शिवमंदिरकडे जाणाऱ्या कच्या गावठाण रोडवर, बंदरपाडा, कल्याण पश्चिम येथे पोलीस आले असता त्याठिकाणी एका संशयित इसम आढळून आला त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ १५ ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन (एम डी.) अं.कि.रु. ३०,०००/- अंमली पदार्थ मिळून आला. सदर प्रकरणी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, हाशमी जाफर हुसैन जाफरी याला अटक करण्यात आली आहे.

सदरची यशस्वी कामगिरी अतुल झेंडे, पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ ०३, कल्याण, कल्याणजी घेटे, सहायक पोलीस आयुक्त साो. कल्याण विभाग, तसेच डॉ. अमरनाथ वाघमोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. विजय नाईक नेम. महात्मा फुले पोलीस ठाणे, कल्याण प. स.पो.नि. अनिल गायकवाड, स.पो.उपनिरी. जितेंद्र ठोके, पो.शि. अमित शिंदे, पो.शि. खुशाल नेरकर, पो.शि.राहुल शिंदे पोलीस उप आयुक्त परि.०३, कल्याण विशेष कारवाई पथक, तसेच खडकपाडा पो. ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी स.पो.नि. विजय गायकवाड, अंमलदार पो. शि.क्र. अनंत देसले, पो.शि.क्र. सतिष मुपडे यांनी केली आहे.