dombivali – एका ३० वर्षीय गतिमंद महिलेवर रिक्षाचालकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही गतीमंद महिला आपल्या नातेवाइकांकडे जात होती. त्यावेळी रिक्षाचालकाने तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी काही तासांत आरोपी फैजल खानला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हि महिला डोंबिवलीतील सोनारपाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे रिक्षाने जात होती. त्यावेळी रिक्षाचालकाने ती गतिमंद असल्याचा फायदा घेत तिला मुंब्रा येथील अज्ञात ठिकाणी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
महिलेने घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. त्यानुसार कुटुंबाने टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुषंगाने पोलिसांनी फैजल खानला अटक केली.तसेच त्याला कल्याण कोर्टात हजर करण्यात आले असून, कोर्टाने ४ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.
दरम्यान, घटनेचा पुढील तपास चालू आहे.