राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी…

Published:

mumbai – राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमामध्ये राज्यातील ५० विकास योजना व पाच नगर रचना योजनांना मंजुरी देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे केली.

पाच नगर रचनांमध्ये पंढरपूर, औंढा नागनाथ व अक्कलकोट या तीर्थक्षेत्रांचा देखील समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. विकास योजनांना शासनाने मंजूरी दिल्यामुळे आता या शहरांचा जलद गतीने नियोजनबद्ध विकास होण्यास मदत होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

विक्रमगड, पोलादपूर ,जव्हार, तलासरी, मोखाडा, नांदुरा, तळा, कळंब, भूम, अक्कलकोट, औंढा नागनाथ, कन्नड, बोदवड, सेनगाव, कळमनूरी, हदगाव, शेंदुर्णी राजगुरुनगर, पाचगणी, बुलढाणा, वाडा, मानोरा, भूम, अंमळनेर, मोर्शी, छत्रपती संभाजीनगर, उरळी देवाची, उमरेड, बार्शीटाकळी, किनवट, किल्ले धारूर, वसमतनगर, चंदगड, मैंदर्गी, फुलंब्री, होळकरवाडी, महाबळेश्वर, मोहोळ औताडे-हांडेवाडी, फुरसुंगी, येवलेवाडी, पूर्णा, मुर्तीजापुर, जळगाव, तिवसा, नायगाव, नेरळ, चांदवड, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका, पंढरपूर, बदनापूर, निफाड, सांगली मिरज कुपवाड या विकास योजनांचा समावेश आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page