mumbai – सुप्रसिद्ध जेष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सन्मान्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली.

सभागृहाला माहिती देताना फडणवीस म्हणाले की, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. १२ मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. राम सुतार यांचे वय १०० वर्षे आहेत. अजूनही ते शिल्प तयार करत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक होत आहे तेथेही बाबासाहेबांची मूर्तीही तेच तयार करत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
दरम्यान, १०० वर्ष वयाचे राम सुतार यांनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे आणि अनेक शिल्पं घडवली आहेत. केवडीया इथला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्ल्भभाई पटेल यांचा पुतळा, मुंबईत इंदू मिल इथल्या स्मारकातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सिंधुदुर्गात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्तावित पुतळा यांचा त्यात समावेश आहे.