raigad – अलिबागच्या समुद्रात एका मच्छिमार बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट अलिबाग येथे खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी अचानक बोटीला आग लागली. बोटीवर १८ ते २० खलाशी होते.

आगीची माहिती मिळताच नौदलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बोटीत असलेल्या खलाशांना सुखरूप बाहेर काढले. तसेच स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली असून, आग विझविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, आग लागल्यामुळे बोटीचं प्रचंड नुकसान झालं आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.