pune – शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेट एसटी बस आगारात बुधवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षाची तरुणी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही़ तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान आरोपी निष्पन्न झाला असून, त्याचा शोध सुरु आहे.