pune – कुख्यात गुंड गजा मारणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. संगणक अभियंता देवेंद्र जोगला मारहाण प्रकरणी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते देवेंद्र जोग यांना गाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून गजा मारणे गँगच्या ४ लोकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गजा मारणेसह या लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यापूर्वी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, एकजण फरार आहे. दरम्यान, गजा मारणेला देखील अटक करण्यात आली आहे.