mumbai – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला उद्या पासून सुरुवात होणार आहे.
यावर्षी ५ हजार १३० केंद्रांवर परीक्षा होणार असून राज्यभरातून सुमारे १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. तसेच हि परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च पर्यंत असणार आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता त्याचबरोबर कोणत्याही गैरमार्गाचा वापर न करता, परीक्षेला सामोरं जावं, असं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे