thane – कोकणातील राजापूर विधानसभेचे माजी आमदार राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
ठाण्यातील आनंदआश्रम येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्याला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करण्यात आले.