bhandara – भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना घडली असून, या स्फोटात कंपनीतील ५ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीतील सी सेक्सनमध्ये भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की स्फोटाचा आवाज ४ ते ५ किलोमीटर दूरवर गेल्याची माहिती आहे. अनेक किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट दिसत आहेत. या कंपनीत दारुगोळा तयार केला जात होता.
दरम्यान, या स्फोटात ५ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.