mumbai – मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. हॉेटेलच्या २७ व्या मजल्यावर एका खोलीत हा मृतदेह आढळला. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विनती मेहतानी असे या महिलेचे नाव असून, नेहमीप्रमाणे हाॅटेलचे कर्मचारी रुम सर्विससाठी गेले असता, या महिलेने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी सदर महिला मृताव्यस्थेत आढळली. सदर घटनेनंतर हॉटेलने पोलिसांनी माहिती दिली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस अधिक तपास करत आहेत.