mumbai – पश्चिम रेल्वेच्या मिरा रोड रेल्वे स्टेशनवर एकाच ट्रॅकवर २ लोकल समोरासमोर आल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. पण सुदैवाने मोटरमनने वेळीच प्रसंगावधान राखत काही अंतरावरच लोकल थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, दादरकडून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मिरा रोड रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर एकाच रेल्वे ट्रॅकवर दोन्ही ट्रेन आल्या. दरम्यान, मोटरनमनच्या सतर्कतेमुळे काही मीटर अंतरावर दोन्ही ट्रेन थांबवण्यात आल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला.