dombivali – नवी मुंबई परिवहन सेवेच्या बसला अचानक आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण-शिळफाटा रस्त्यावर मानपाडा हद्दीतील रुणवाल चौक येथे या बसला आग लागली. चालकाने तत्परतेने प्रवाशांना बसमधून उतरण्याचे आवाहन केले. आणि तो स्वतः देखील बसमधून उतरला.
दरम्यान, त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या कोळसेवाडी शाखेच्या वाहतूक पोलिसांनी तातडीने बसमधील प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. आग विझवण्यात आली असून, सुदैवाने या आगीत कोणीतीही जीवितहानी झाली नाही.