उल्हासनगर आयुक्त विकास ढाकणे यांची बदली…

Published:

Ulhasnagar – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उल्हासनगरसारख्या शहरांच्या पायाभूत विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आणि ‘एक्शन मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले उल्हासनगर महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिव पदी नियुक्ती झाली आहे.

उल्हासनगर महापालिका आयुक्तपदी विकास ढाकणे यांची गेल्या ऑगस्ट महिन्यात नियुक्ती झाल्यावर, त्यांनी महापालिका प्रशासनावर फक्त ४ महिन्यात चांगली पकड निर्माण केली होती. तसेच खुल्या जागेत आणि रस्त्याच्या बाजूच्या हरितपट्टा तयार करणे, अवैध बांधकामे नियमित करणे, धोकादायक इमारतीचा प्रश्न शासनकडे लावून धरून आयुक्त आणि महापौर बंगल्याला प्राधान्य दिले.

नवीन महापालिका इमारतीचा आराखडा मंजूर करून घेतला, महापालिकेची स्वतःची पाणी पुरावठा योजना प्रस्तावासाठी पाठपुरावा केला. तसेच विविध विकास कामावर लक्ष केंद्रित केले होते. मात्र अचानक त्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने सर्वाना आश्चर्यचा धक्का बसला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page