mumbai – महाराष्ट्रातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ठरला आहे. येत्या ५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स अकाउंटवरून माहिती दिली आहे.
बावनकुळे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.