new delhi – ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच याबाबत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोलही सुनावले. डॉ. के.ए.पॉल यांनी ही याचिका केल होती. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती पी.बी. वराळे यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनावणीवेळी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात आणि निवडणूक हरलं की तुम्हाला ईव्हीएममध्ये छेडछाड दिसते, अशा शब्दात न्यायालयाने याचिकाकर्त्यांना झापलं आहे.
तसेच पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं? असा सवालही सर्वोच्च न्यायालयाने केला.