mumbai – महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांचा निकाल लागला असून, यात महायुतीने 288 पैकी 230 मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवलेला आहे. पण यंदाच्या वेळेस 288 पैकी 22 जागांवर महिलांचा विजय झाला आहे. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक महिला आहेत.
भाजपच्या 14, राष्ट्रवादीच्या 4, शिवसेनेच्या 2, महिला आमदार निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसच्या 1 महिला आमदार निवडून आल्या आहेत. गेल्या निवडणुकीच्या (२०१९) तूलनेत यंदा महिला आमदारांची संख्या घटली आहे.
विजयी महिला उमेदवारांची नावे…
भाजप
श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे, सीमा हिरे, मंदा म्हात्रे, मनीषा चौधरी, विद्या ठाकूर, माधुरी मिसाळ, मोनिका राजळे, नमिता मुंदडा, श्रीजया चव्हाण, सुलभा गायकवाड, स्नेहा पंडित, अनुराधा चव्हाण,
शिवसेना
मंजुळा गावित, संजना जाधव
राष्ट्रवादी काँग्रेस
सुलभा खोडके, सरोज अहिरे, सना मलिक, अदिती तटकरे
काँग्रेस
ज्योती गायकवाड