mumbai – सराईत गुन्हेगाराकडून १ देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे ट्रॉम्बे पोलीसांनी हस्तगत केली आहेत. आदित्य शाम पारखे उर्फ मिठूठू असे याचे नाव आहे.
ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत आरोपी आदित्य शाम पारखे उर्फ मिठूठू हा संशयित हालचाली करीत असल्याचे दिसून आल्याने पोलीस पथकाने त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ देशी बनावटीचे अग्निशस्त्र व २ जिवंत काडतुसे मिळून आली. सदर प्रकरणी पोलिसांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दरम्यान, आदित्य शाम पारखे उर्फ मिठूठू हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर १२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.