new delhi – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल घोषित होतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत यासंदर्भात माहिती दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही २२ ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार २९ ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर ३० ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर ४ नोव्हेंबर २०२४ ला उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत. २५ नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आचारसंहिताही लागू झाली आहे.