mumbai – अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्वेतील निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर रात्री ९ च्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केले. हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.