बदलापूर – बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील शाळेचे संचालक आणि सचिव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. बदलापूर येथे एका शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी शाळेचे संचालक उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर गुन्हा दाखल होण्याआधीच दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. या फरार आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. दरम्यान यावर सुनावणी करताना हायकोर्टाने फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असताना घटना दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. घटनेनंतर गुन्हा दाखल होण्याआधीच दोन्ही आरोपी फरार झाले आहेत. ज्यानंतर अद्यापही या दोघांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आलेले आहे. पण या आरोपींनी बेपत्ता राहूनही आपला अटकपूर्व जामीन अर्ज सुरुवातीला सत्र न्यायालयात सादर केला होता. तो सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. ज्यामुळे त्यांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. पण हायकोर्टानेही तो नाकारला आहे.