डोंबिवली – बैलगाडा शर्यत गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोघांना कल्याण गुन्हे शाखेने अटक केली आहे. किरण गायकवाड आणि दिपेश जाधव अशी या दोघांची नावे आहेत.
२०२२ मध्ये राहुल पाटील आणि त्याच्या साथीदारांवर अंबरनाथ मधील सुदामा हॉटेल जवळ MIDC कार्यालयासमोर बैलगाडा शर्यतीच्या बाबतीत चर्चा करायची आहे असे प्लॅनिंग करून त्यांच्यावर जिवे ठार मारण्याचा कट रचून रिव्हॉल्व्हर आणि बंदुकांनी अंदाधुंद गोळीबार करून या सर्वांचा खून करण्याचा प्रयत्न पंढारीनाथ फडके व त्यांच्या साथीदारांनी केला होता त्यासंदर्भात शिवाजी नगर पोलीस स्टेशन अंबरनाथ येथे गुन्हा दाखल आहे.
त्या गुन्ह्यातील काही आरोपी पकडले असून काही आरोपीत आद्यपर्यंत वांटेड आहेत त्यापैकी वांटेड असलेले व मोक्का अंतर्गत कायद्याच्या कारवाईत पाहिजे असलेले महत्त्वाचे दोन आरोपी किरण गायकवाड आणि दिपेश जाधव हे दोघे डोंबिवली पूर्वेतील मानपाडा शिळ रोड, रुणवाल गार्डनच्या गेट समोर भेटणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे सहा.पोउपनिरी.दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यानुषंगाने कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना अटक केली.
त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून, यातील किरण गायकवाड हा मानपाडा पो.स्टे.च्या रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे. तसेच शिवाजी नगर पोलीस स्टेशन गु.र.नं.403/2022,भा. द.वि.क.307,143,147,148,149,341,506,506(2)427,120(ब)सह शस्त्र अधिनियम क.3,25,म.पो.का.क.37(1)135 या गुन्ह्यात दोन्हीही आरोपी हे गेल्या दिड वर्षापासून (वांटेड) पाहिजे आरोपीत असून सदर वरील गुन्ह्यात निष्पन्न झाले. तसेच फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 1932 चे कलम 7 सह,महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम 3(!!) 3,(2),3(4) (मोक्का)अंतर्गत कायद्याप्रमाणे कारवाईत पण वरील दोन्हीही आरोपीत पाहिजे असून, या दोघांना पुढील तपासकामी अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची यशस्वी कामगिरी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनिरी संतोष उगलमुगले, सहा.पोउप निरी दत्ताराम भोसले, पो.हवा.विलास कडू, विश्वास माने, उमेश जाधव, गुरुनाथ जरग, बोरकर (चालक) यांनी केली आहे.