मविआचा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर, हायकोर्टाचा निर्णय…

Published:

मुंबई – बदलापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने उद्या (२४ ऑगस्ट) राज्यामध्ये बंद पुकारला आहे. मात्र, अशाप्रकारे बंद घोषित करणे बेकायदा असून कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज तातडीची सुनावणी पार पडली. त्यावर हायकोर्टाने महाविकास आघाडीने पुकारेला बंद बेकायदेशी आहे, अशा संवेदनशील घटनाबाबत कोणीही बंद पुकारू शकत नाही, तरीही कोणी बंद पुकारून आंदोलन केलं तर सरकारला कायेदशीर कारवाई करण्याचे अधिकार असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page