मुंबई – बदलापूरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी विरोध पक्ष कोणतेही राजकारण करत नसल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
महाराष्ट्रातील परिस्थितीनुसार राज्यातील मुलीसुद्धा सुरक्षित नाहीत. या घटनेला दाबण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. शाळेची संस्था भाजप आणि आरएसएसची असल्यामुळे त्यांची बदनामी होऊ नये म्हणून काळजी घेतली गेली. महिला पत्रकाराला महायुतीच्या पदाधिकाऱ्याने अपशब्द वापरले. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. रोज महाराष्ट्राला काळिमा लावण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यामुळे येत्या २४ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक आम्ही दिलेली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे सगळे सहभागी होणार आहेत. यामाध्यमातून अकार्यक्ष सरकारला आरसा दाखवण्याचे काम जनता करेल, असं नाना पटोले म्हणाले.