मुंबई – लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकातून निघालेल्या गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण आणि डोंबिवली दरम्यान असलेल्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास ठाकुर्ली स्थानकाजवळ लोकमान्य टिळक गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरमध्ये अचानक आग लागली होती. ब्रेक लायनरला आग लागताच गोरखपूर एक्सप्रेस थांबवण्यात आली. त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या ट्रेनवर परिणाम झाला होता. पण त्यानंतर आता ही गाडी कल्याण दिशेने रवाना झाली आहे.