हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे दोन धक्के…

Published:

hingoli – हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे दोन धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात सकाळी ९.४३ वाजता ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. या भूकंपाचे धक्के हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जाणवले. त्यापूर्वी औंढा नागनाथ तालुक्यातील गढाळा परिसरात सकाळी ७.४६ वाजता भूगर्भातून आवाजासह सौम्य धक्का जाणवला. या धक्क्याची नोंद ३.३ रिश्टर स्केल इतकी झाली.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यक त्या ठिकाणी पाहणी व पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page