शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करा, वीज बील माफ करा – विजय वडेट्टीवार…

Published:

मुंबई – शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन त्यांचं थकित वीजबिल माफ करावं, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येत वाढ झाली आहे, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला.

निर्यात बंदी, शेतमालाला भाव नसणं, कर्जाचा वाढता बोजा, पीकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक, खतं, बियाणं, शेती अवजारे यांचे वाढलेले दर, तसंच महागाईनं गाठलेला उच्चांक, यामुळे शेतकरी त्रस्त असल्याचं त्यांनी म्हटलं. हमीभावाचा दावा दिशाभूल करणारा आहे, असंही ते म्हणाले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page