मुंबई पदवीधरमधून अनिल परब विजयी…

Published:

नवी मुंबई विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण २८ टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण ६७ हजार ६४४  मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी ६४ हजार २२२  मते वैध ठरली तर ३ हजार ४२२ मते अवैध ठरली.  जिंकून येण्यासाठी  ३२ हजार ११२  इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.

उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे

1) ॲड.अनिल विजया दत्तात्रय परब, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना :- ४४ हजार ७८४ (विजयी)

2) किरण रवींद्र शेलार, भारतीय जनता पार्टी :- १८ हजार ७७२

3) योगेश बालकदास गजभिये  :- ८९

4) ॲड.अरुण बेंडखळे, अपक्ष :- ३९

5) ॲड. उत्तमकुमार (भाईना) नकुल सजनी साहु, अपक्ष  :- ११

6) मुकुंद आनंद नाडकर्णी, अपक्ष :- ४६४

7) रोहण रामदास सठोणे, अपक्ष  :- २६

8) ॲड. हत्तरकर सिध्दार्थ (सिध्दरामेश्वर) नि, अपक्ष :- ३७

पहिल्या पसंतीची ४४ हजार ७८४ मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार ॲड. अनिल विजया दत्तात्रय परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page