वैनगंगा नदीत पत्रकारांना घेऊन जाणारी बोट बुडाली…

Published:

नागपूर – पत्रकारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीत बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यावेळी हि घटना घडली. बचाव पथक वेळेवर पोहचल्याने पत्रकारांचा जीव वाचला.

मिळालेल्या माहितीनुसार, वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट एका खडकावर आपटून तिचे तीन तुकडे झाले.

दरम्यान, बचाव पथक वेळेवर पोहचल्याने मोठा अनर्थ टळला.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page