डोंबिवलीत वृद्ध महिलेचा खून, आरोपीस अटक…

Published:

डोंबिवली – एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा रस्सीच्या सहाय्याने गळा आवळून खून करणाऱ्या आरोपीस अवघ्या ६ तासात विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. यश सतीश विचारे असे याचे नाव आहे. तर आशा रावकर असे मृत महिलेचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेतील वसंत निवास बिल्डींग येथे राहणाऱ्या महिलेचा रस्सीच्या सहाय्याने गळा आवळून खून करुन तिच्या गळयातील माळ व कानातील कर्णफुले चोरी झाली असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास करून, मिळालेल्या माहितीच्या आधारे यश सतीश विचारे याला अटक केली.

त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याला मोबाईल मध्ये बेटिंग लोटस ३६५ या साईट वर क्रिकेटचा ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद असल्याने व त्यामुळे त्यावर ६०,०००/- रुपये चे कर्ज झाल्याने सदरचे कर्ज भरण्यासाठी त्याने त्याच्या बिल्डींगमध्ये राहणाऱ्या आशा रावकर हीचा खून केला आणि सोनं चोरी केले असल्याची माहिती समोर आली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page