मला सरकारमधून मोकळं करावं – फडणवीस…

Published:

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील पराभवाची जबाबादारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली असून, मला सरकारमधून मोकळं करावं अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपाला महाराष्ट्रात सामना कराव्या लागलेल्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारत आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळं करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page