नाशिक – निफाड तालुक्यातील शिरसगाव येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान सुखोई ३० कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका शेतात हे विमान कोसळले. वैमानिक आणि सहवैमानिक वेळीच बाहेर पडल्याने बचावले. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

परंतु या दुर्घटनेत विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.