अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सोमवार पासून म्हणजेच ३ जून २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता अमूल गोल्डची किंमत ६४ रुपये/लिटरवरून ६६ रुपये/लिटर झाली आहे. अमूल टी स्पेशलची किंमत ६२ रुपयांवरून ६४ रुपये प्रति लिटरपर्यंत झाली आहे.
ताज्या दर वाढीमुळे ५०० मिली अमूल म्हशीचे दूध, ५०० मिली अमूल गोल्ड दूध आणि ५०० मिली अमूल शक्ती दुधाचे सुधारित दर अनुक्रमे ३६ रुपये, ३३ रुपये आणि ३० रुपये झाले आहेत.