पुणे – पोर्शे अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. याच आरोपाखाली शिवानी अग्रवाल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप देखील शिवानी अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे.