डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, या स्फोटामुळे आजूबाजूच्या घराच्या काचा फुटलेल्या आहेत. तसेच गाड्यांच्या काचाही फुटल्या आहेत. धुराचे लोट या परिसरात पसरले असून, स्फोटामुळे डोंबिवलीकरांमध्ये भितीचे वातावरण आहे.
